⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर लाँच

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातल्या वादाला आता अधिकाधिक वाढताना दिसून येत आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्क मिळाल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उर्जा प्रफुल्लित झाली आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाचाही दसरा मेळावा मुंबईच्या बीकेसी मैदानात होणार आहे.त्यातच शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आल आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याच्या जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आले आहे. यासह बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘विचारांचे आम्हीच वारसदार’ असा उल्लेख करून करण्यात आला आहे.

शिंदे गटाने औरंगाबाद जिल्ह्यातून तब्बल १० हजार वाहनांतून २५ हजार जणांना नेण्याचे नियोजन केले आहे. तर उद्धव सेनेच्या गटाने ३ हजार वाहनांतून १५ हजार कार्यकर्त्यांना मुंबईत नेण्याची तयारी केली आहे. दाेन्ही गटांकडून शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.