भुसावळात डंपर-पिकअपचा भीषण अपघात; एक ठार, दोन जण जखमी

ऑक्टोबर 19, 2024 12:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२४ । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे – मोंढाळा रस्त्यावर डंपर आणि पिकअप वाहनाचा अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

kurha acident

या घटनेबाबत असे की, कुऱ्हा पानाचे ते मोंढाळा गावादरम्यान विजय कोळी यांच्या शेतासमोर पिकअप व्हॅन (एम.एच. १९, सी. वाय. ८०४९) व डंपर (एम.एच. १९ झेड. ३९४३) यांचा अपघात होऊन यात पिकअप चालक भावसिंग रामदास पवार (रा.धानोरी ता. बोदवड) याचा मृत्यू झाला.

त्याच्यासोबत असलेले प्रविण संजय जाधव, अजय आनंदा बेलदार हे गंभीर जखमी झाले. याबाबत ईश्वर संजू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकुमार काळे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now