भरधाव डंपरने दुचाकीला उडविले, एक ठार

सप्टेंबर 4, 2022 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच मृत्यू झाल्याची घटना भोणे फाट्याजवळ घडली आहे. तर या अपघातात दुसरा गंभीर जखमी झाला असून जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केले आहे. सतीश जस्वल असे अपघातातील मृताचे नाव असल्याचे समोर आले आहे. तर संजय सीताराम महाजन असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे.

bhone accident jpg webp

धरणगाव येथून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडविले. यात एकाच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडलीय. दरम्यान, दोन्ही व्यक्ती हे डी-मार्टचे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रूग्णालयात रवाना केले आहे.

दरम्यान, यावेळी खा. उन्मेश पाटील यांनी जिल्हा शासकीय रूग्णालय आणि डी-मार्टच्या प्रशासनाशी मोबाईलवर संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now