बातम्या

महापौर व आयुक्तांच्या मध्यस्तीमुळे शहरातील कचरा संकलनाला पुन्हा झाली सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांनी थकीत वेतन मिळण्यासह वेतनवाढीसाठी आजपासून संप पुकारला होता. मात्र, महापौर व आयुक्त यांच्या आश्वासनानंतर वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.

वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असतांना गेल्या २ महिन्याचे त्यांचे वेतन थकलेले आहे. हे थकीत वेतन मिळावे याकरिता आजपासून सकाळी टीबी हॉस्पिटल येथे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.यावेळी त्यांनी काम करण्यास नकार दिला होता.याचबरोबर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कंपनीचा निषेध केला. पर्यायी कचरा संकलनासाठी एकही गाडी बाहेर निघत नव्हती. हा गोंधळ जवळपास तीन तास चालला.

अखेर महापौर जयश्री महाजन, आयुक्त देविदास पवार यांनी धाव घेत कर्मचाऱ्यांनी चर्चा करून संप न करण्याबाबत समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचारी आपलय मागणीवर ठाम राहिले. यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी आज सायंकाळपर्यन्त महापालिका वॉटरग्रेस कंपनीच्या खात्यात पैसे जमा करेल यानंतर वॉटरग्रेस कंपनीकडून आपणास उद्या वेतन देईल असे आश्वासन दिले. तसेच हे आश्वासन पूर्ण न झाल्यास तुम्ही परवापासून संप पुकारू शकता असे स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button