जळगाव जिल्हायावल
शिकण्याच्या जिद्दीतून ५२ वर्षीय महिलेने सोडवला बारावीचा पेपर
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । आजी बाई तुम्ही पण… असा सवाल यावल शहरातील साने गुरूजी विद्यालयाच्या परिक्षा केंद्रातवर परिक्षा देण्यासाठी आलेल्या ५२ वर्षिय महिलेस सवाल करण्यात आला. होय आपणास पास व्हायचय असे उत्तर आजीबाई कडून मिळाले व त्यानी पेपर सोडवला एकूणच शिक्षणास वय आडवे येत नाही. मात्र प्रचंड आत्मविश्वास व जिद्द असल्यास आपण पाहिजे, ‘त्या’ वयात विविध परिक्षा देवू शकतो याचे उदाहरण शुक्रवारी बघायला मिळाले.
यावल तालुक्यात एकुण २७ परिक्षा केद्र आहे. ३ हजार ५०५ विद्यार्थ्यापैकी ३ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून
तालुक्यातील ५७ विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्चा पेपरला दांडी मारली. तसेच शहरात व तालुक्यात सर्वच परिक्षा केद्रावर सुरळीत व शांततेत परिक्षा पार पडली.