नगरपरिषद निवडणूक : यावलला ५४ इच्छूकांना ‘वेट अँड वॉच’च्या सूचना

जुलै 23, 2022 5:01 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी तयारी सुरु केली असून आज शनिवारी यावल शहरात देखील काँग्रेस कमिटीची चर्चा बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार शिरीष चौधरी हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ५४ इच्छूकांना उमेदवारांना ‘वेट अँड वॉच’च्या सूचना दिल्या.

yawal 1 jpg webp

तसेच इच्छूक उमेदवारांचे फॉर्म तपासून घेतले. यावेळी प.स.गट नेते शेखर पाटील, शहर अध्यक्ष कदीर खान, माजी नगरसेवक सय्यद युनूस, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, माजी नगरसेवक रसूल शेठ, माजी नगरसेवक करीम कांची, माजी नगरसेवक शेख अस्लम, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, माजी नगरसेवक शेख जाकीर माजी नगरसेवक समीर खान, अनिल जंजाळे, इम्रान पहेलवान, कालू मास्टर, नईम शेख, विक्की गजरे, रशीद मन्यार, शेख वासिम, आशफक शाह, शेख सकलेन, सईद शाह, जाकीर मेंबर, मिर रेहान सय्यद आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now