महाराष्ट्रातील या विभागात निघाली जम्बो भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची संधी..

ऑगस्ट 4, 2024 2:27 PM

तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीद्वारे 289 जागा भरल्या जाणार आहेत. DTP Maharashtra Bharti 2024

job jpg webp

पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM) आहे.DTP Maharashtra Recruitment 2024

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रचना सहायक (गट ब) 261
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) 19
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

इतका पगार मिळेल :
रचना सहायक (गट ब) – 38,600/- ते 1,22,800/-
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – 41,800/- ते 1,32,300/-
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – 38,600/- ते 1,22,800/-

वयाची अट : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now