जळगाव जिल्हा

Jalgaon : तळीरामांनो खबरदार..अन्यथा हजारो रुपयांचा दंड अन् वाहन होणार जप्त, ‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांकडून बंदोबस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे एक दिवस उरले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी नववर्षाच्या सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. मात्र नववर्षाच्या उत्साहात डुबलेल्या नागरिकांना पोलिसांकडून एक महत्त्वाचे आवाहन केले जात आहे. 31 डिसेंबरच्या रोजी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करणार आहेत. या दिवसात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जळगाव शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साहित आहेत, परंतु या उत्साहात अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करून तळीरामांवर कारवाई केली जाणार आहे.

थर्टी फर्स्टला ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ने तपासणी केली जाणार असून वाहनधारक मद्यपान केलेला आढळल्यास त्याला १० ते ११ हजारांपर्यंत दंड करण्यासह त्याचे वाहन जप्त केले जाणार आहे. ‘थर्टी फर्स्ट’ला अनेक जण पार्टी करून वाहने सुसाट चालवितात. त्यादृष्टीने पोलिसांकडून एक दिवस अगोदर म्हणजे आज ३० डिसेंबर रोजी रात्रीही तपासणी होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button