जळगावकरांसाठी महत्त्वाची बातमी: २० मे रोजी औषधांची दुकाने बंद! ‘एफडीए’चे नागरिकांना आगाऊ औषध खरेदीचे

मे 15, 2026 6:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या बुधवार, २० मे २०२६ रोजी संपूर्ण देशभरात लाक्षणिक बंदची हाक दिली आहे. या आवाहनानुसार जळगाव शहर आणि जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रेते आपले व्यवहार बंद ठेवणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील औषध बाजारपेठ पूर्णपणे ठप्प राहण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या घरातील अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे जाहीर आवाहन अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केले आहे.

medical store

दरम्यान, आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औषध प्रशासन व पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभुमीवर, सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केमिस्ट बांधवांना आवाहन केले आहे की, या बंदमध्ये सहभागी होऊ नये. औषधे ही अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषधांचा पुरवठा न करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णांना औषधांच्या अभावामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार – मो. ९४२२३५६१४३ व श्रीमती क. र. पाटील – मो. ९८६०१७२५६१ यांच्याशी संपर्क साधावा व नागरिकांनी शांतता व संयम राखून औषध प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories