चोपडा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा- आमदार लता सोनावणे
जळगाव लाईव्ह न्यूज।१ ऑगस्ट २०२१। चोपडा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठकीचे आयोजन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी चोपडा तालुक्यात उष्कळ जाहीर करण्यात यावा असे विनंतीचे पत्र आमदार लता सोनावणे यांनी पालकमंत्र्यांना दिले.
चोपडा तालुक्याचे पावसाचे सरासरी पर्जन्यमान ७३१.८० मि.मी. व यावल तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६४२.७ मि.मी. इतके असून चालू वर्षात सरासरी पर्जन्यमानानुसार जून व जुलै महिन्याचे एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत चोपडा तालुक्यात ४७.७०% व यावल तालुक्यात ३६.३% इतकाच पाऊस झालेला आहे. या बाबींचा विचार करता या दोन्ही तालुक्यात कोरडवाहू क्षेत्रात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झालेली असल्याने चोपडा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी पालकमंत्री यांना पत्र देण्यात आले. दिले. यावेळी आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व चोपडा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.