वडिलांच्या आठवणीत गहिवरले डॉ.उल्हास पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं, ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होत. आज सर्व काही आहे मात्र बाबा तुम्ही आमच्यात नाही, ही खंत आहे, असे उद्गार काढले माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी काढले.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व उपाध्यक्ष सुभाष पाटील यांचे वडिल कै.वासुदेव घनश्याम पाटील (गुरुजी) यांचा आज ७ जून रोजी पुण्यतिथी दिवस. त्यानिमित्त आज सकाळी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयात डॉ.उल्हास पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या उपस्थीतीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी स्व.वासुदेव गुरुजी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण केले तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले, लेखापाल विकास बेंडाळे, श्री झांबरे, गोपाळ भोळे, स्टुडंट सेक्शन प्रमुख अनंत इंगळे, आशिष भिरुड यांच्यासह विद्यार्थी उपस्थीत होते. उपस्थीतांनी देखील वासुदेव गुरुजींच्या प्रतिमेला अभिवादन केले.
- महत्वाची चौकट – शैक्षणिक संकुलांमध्ये गुरुजींचे स्मरण
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल सावदा व भुसावळ, गोदावरी सीबीएसई स्कूल, जळगाव, जीआयएमआर, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय, सायन्स कॉलेज, हरीभाऊ जावळे इन्स्टीट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होमसायन्स, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेद, डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय शैक्षणिक संंकुल, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय आदि ठिकाणी स्व.वासुदेव गुरुजींचे पुण्यतिथीनिमित्त स्मरण करण्यात आले. याप्रसंगी सर्व संस्थांचे मुख्याध्यापक, प्राचार्या, विभागप्रमुख, टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफ उपस्थीत होता.