महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना राज्यस्तरीय ’वॅलर अवॉर्ड’ प्रदान

मार्च 17, 2026 4:44 PM

मुंबईत संपन्न झालेल्या परिषदेत गौरव; संकटकाळात दिलेल्या योगदानाची दखल

dr sudhir narkhede

जळगाव लाईव्ह न्यूज । वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून निस्वार्थ सेवा बजावणारे आणि संकटकाळात सहकार्‍यांना तसेच रुग्णांना खंबीर साथ देणारे महादेव हॉस्पिटल येथील हाय डिपेन्डसी युनिटप्रमुख, प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठित ’मॉग्स-अमॉग्स वॅलर अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिअट इंटरनॅशनल (सहार) येथे पार पडलेल्या ’अमॉग्स २०२६’ (-चजॠड २०२६) या राज्यस्तरीय परिषदेत त्यांना या सन्मानाने गौरवण्यात आले.

मुंबई ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (चजॠड) आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज (-चजॠड) यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवारी, १४ मार्च रोजी झालेल्या ’स्त्री गौरव’ पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ. नारखेडे यांना खा. डॉ. अमोल कोल्हे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्रातील कठीण प्रसंगात, आणीबाणीच्या वेळी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत धैर्याने व शांतपणे कार्य करून महिलांचे प्राण वाचवणार्‍या डॉक्टरांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ’टीम मॉग्स २०२५-२६’ ने या विशेष पुरस्काराची सुरुवात केली आहे. डॉ. सुधीर नारखेडे यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत केवळ रुग्णसेवाच केली नाही, तर संकटसमयी आपल्या सहकार्‍यांनाही मोलाची मदत केली आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची आणि महिला आरोग्याप्रती असलेल्या समर्पणाची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे. या यशाबद्दल डॉ. सुधीर नारखेडे यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now