⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रिव्हीजन टीएचआर शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १ ऑगस्ट २०२३| मागील ८ वर्षांपूर्वी संपूर्ण खुबा बदल शस्त्रक्रिया झालेल्या ५० वर्षीय रुग्णाचा खुबा अचानक जागेवरून निखळला. असह्य वेदनांनी त्रस्त झालेल्या रुग्णावर डॉ. उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनद्वारे रिव्हीजन टीएचआर शस्त्रक्रिया करण्यात आली असून रुग्णाची दिनचर्या सुरळीत झाली.

खामगाव तालुक्यातील रहिवासी ५० वर्षीय रुग्णाची आठ वर्षापूर्वी टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी सिमेंटेड खुबा बसविण्यात आला होता. त्या खुब्याच्या आधारे रुग्णाची किमान ८ ते कमाल १० वर्ष निघतात. सदर रुग्ण शेतीकाम करून उदरनिर्वाह चालवित होता. आठ महिन्यांपूर्वी काम करीत असताना तो पडला आणि खुब्याला दुखापत झाली. परिणामी त्याला चालणे अवघड झाले आणि डावा पाय देखील ५ सेंटीमीटर कमी झाला. परिणामी सर्वच शरीराचा तोल ढासळला. मागील आठ महिन्यापासून रुग्णाने दुखणे अंगावर सहन केले.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात आल्यावर अस्थिरोग विभाग प्रमुख तथा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. दीपक अग्रवाल यांनी रुग्णाची तपासणी करून एक्स रे करण्यास सांगितला. रिपोर्टनुसार रुग्णाचा खुबा निघाला असून पेल्विक रिजनलाही दुखापत झाली होती. त्यामुळे रिव्हीजन टीएचआर या शस्त्रक्रियेची गरज होती. रुग्णाच्या संमतीनुसार जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. दीपक अग्रवाल यांच्या टीमने आणि भुलरोग तज्ञ डॉ. शितल यांच्या सहाय्याने खुबा बदल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला चांगल्या दर्जाची केज आणि कॅप ( Cage CAP) लावण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस वॉकरचा आधार घेऊन रुग्णाची चालायला सुरुवात झाली.

मागील दोन दशकात संपूर्ण सांधा बदल शस्त्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. ज्यांची खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे त्यांना कालांतराने पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागते. कुठल्याही कृत्रिम खुब्याचे जीवन हे साधारणतः दहा ते वीस वर्षे इतके असते. त्यामुळे खुबा खराब झाल्यास अशा प्रकारच्या रिव्हीजन टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची दिनचर्या पूर्वप्रत होते. – डॉ. दीपक अग्रवाल, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, विभाग प्रमुख अस्थिरोग, डॉ. उल्हास पाटील धर्मादाय रुग्णालय.