खुशखबर! जळगाव विमानतळावरून लवकरच अहमदाबादसाठी विमानसेवा

ऑक्टोबर 26, 2024 12:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२४ । जळगावकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच जळगाव विमानतळावरून आता अहमदाबादसाठी विमानसेवा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे.

jalgaon airport jpg webp

जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद तसेच मुंबई ही विमानसेवा सुरू आहे. आता जळगाव-अहमदाबाद अशी विमानसेवा लवकर सुरू होणार असल्याची माहिती समोर येत असून, ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे. मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी ही विमानसेवा सुरू होणार आहे. अहमदाबादवरून सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटाला विमान जळगावकडे रवाना होईल.

जळगावला सात वाजता येईल. जळगाववरून सात वाजून २५ मिनिटाला विमान अहमदाबादला उड्डाण करेल. अहमदाबाद विमानसेवा सुरू करण्याबाबत जळगाव जिल्ह्यातील व शहरातील व्यापारी वर्गाकडून पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, व्यापारी वर्गाला या विमान सेवेचा फायदा होणार आहे.

जळगाव-मुंबई आता चार दिवस विमान कंपनीने मुंबई-जळगाव तीन दिवस सुरू असलेली विमानसेवा आता चार दिवस सुरू करणार आहे. रविवार, सोमवार, गुरुवार व शुक्रवार अशी विमानसेवा सुरू होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now