⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | बातम्या | डॉ. मुरहरी केळे महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी रुजू

डॉ. मुरहरी केळे महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी रुजू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । : महावितरण कंपनीच्या संचालक (वाणिज्य) पदाचा कार्यभार डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी नुकताच स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. या आधी ते मुख्य अभियंता (देयके व महसूल) म्हणून महावितरणमध्ये कार्यरत होते.

वीज वितरणाच्या क्षेत्रातील तज्ञ व विश्लेषक म्हणून ओळख असणारे डॉ. केळे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते कनिष्ठ अभियंता म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध वरिष्ठ पदांवर त्यांनी चिपळूण, गुहागर, खेड, भिवंडी, मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी काम केले आहे. तर अकोला परिमंडळासह महावितरणच्या मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक, तांत्रिक आस्थापना, देयके व महसूल या विभागांचे मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीमध्ये संचालक (तांत्रिक) तसेच वीजपुरवठ्यासाठी अतिशय आहानात्मक असलेल्या त्रिपुरा राज्याच्या विद्युत मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. मुरहरी केळे यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक व साहित्यिक असलेले डॉ. मुरहरी केळे यांची मराठी व इंग्रजीमध्ये पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादनदेखील केले आहे. सोबतच वीज वितरणासह प्रामुख्याने ‘स्मार्ट मीटर’संबंधी त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने त्यांना ‘पीएचडी’ पदवी प्रदान केली आहे. तसेच अभियांत्रिकीसह व्यवस्थापन, विधी, वाणिज्य, नियामक, लेखा परीक्षण आदी विषयांमध्ये त्यांनी शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. विद्युत क्षेत्रातील कामाचा त्यांना सुमारे ३२ वर्षांचा अनुभव आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह