लाखो धारकर्यांच्या साक्षीने धारातीर्थ यात्रा मोहीमेचा समारोप
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचे मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । नरवीर तानाजीराव मालुसरे समाधी (उमरठे) ते भगवान शिवछत्रपती समाधी रायगड धारातीर्थ यात्रा गडकोट मोहीम 7 फेब्रुवारी रोजी सुरू होऊन मंगळवारी लाखो धारकर्यांच्या साक्षीने रायगड येथे समारोप झाला.
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी असा शिवजागर करीत लाखो धारकरी हे रायगडावर पोहोचले. या मोहिमेच्या समारोपीय कार्यक्रमात मंचावर प. पु. संभाजीराव भिडे गुरुजी, रावसाहेबजी देसाई, ना. भरत गोगावले, हातकणंगले चे आ. अशोकराव माने, रावेर-यावलचे आ. अमोल जावळे, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, धुळे शहरचे आ.अनुप अग्रवाल, आ.सुरेंद्र गाडगीळ, मुळशीचे आ.शंकरराव, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, प्रदिप मोडक, सुनीलबापू लाड सरसेनापती अशोकराव विरवाड, अहिल्यानगर शिवसेना जिल्हा प्रमुख अनुप डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाखो धारकर्यांना ना. भरत गोगावले आणि भिडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
रायगड झाला भगवामय
भल्या पहाटे पासून मोठ्या संख्येने धारकरी रायगडावर पोहचले होते. किल्ले रायगड संपूर्ण भगवामय झाला होता आणि शिवरायांच्या जयघोषाने दणाणून गेला होता.लाखोंच्या संख्येने धारकरी असूनही सर्वत्र शिस्तीचे पालन दिसले.
डॉ. केतकी पाटील यांचा धारकर्यांशी संवाद
याप्रसंगी भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, मुक्ताईनगर, शेंदुर्णी, बोदवड, सावदा, फैजपूर सह जिल्ह्यातील धारकर्यांशी येथे संवाद साधला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जळगांव जिल्हा प्रमुख आकाश फडे, जळगांव शहर प्रमुख विजय कासार, भुसावळ जिल्हा प्रमुख रितेश जैन, चोपडा विभाग प्रमुख जिग्नेश कंखरे आदी उपस्थित होते.