जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम ! दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे, तर हा दिवस आहे प्रेरणेचा, परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा. त्यानिमित्त आज जळगाव सह जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी पाटील ह्या सहभागी झाल्यात. तसेच समाज बांधवांना शुभेच्छा दिल्यात.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ केतकी पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातील वसंत स्मृती कार्यालय तसेच जी एम फाऊंडेशन मध्ये
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संविधानाचे वाचन तसेच बुद्ध वंदना देखील सामूहिकरीत्या म्हणण्यात आली.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, रेखा ताई वर्मा, डॉ राधेश्याम चौधरी, उदयजी भालेराव, माउली भाऊ जगताप शिवसेना पुणे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख, किशोर अहिरे भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष पुणे, रोशन भाऊ मराठे लक्ष फाउंडेशन पुणे, वेदांतजी पाटील पुणे उद्योजक, जयवंतजी पाटील एस पी सोलर डायरेक्टर पुणे, एकनाथजी सोनवणे मल्टी सर्विसेस एस पी सोलर डायरेक्टर पुणे, हिरालाल पाटील खानदेश प्रतिष्ठान अध्यक्ष, दिलीप वसंत पाटील चाकण एमआयडीसी युनियन लीडर पुणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वानी संविधानाचे वाचन केले. तसेच त्यांच्या कार्याचे समरण केले.