---Advertisement---
जळगाव जिल्हा

अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दीनिमित्त ३०० कि.मी. रॅलीसाठी डॉ. केतकी पाटील फाउंडेशनचा पाठिंबा

---Advertisement---

३०० वाहनांची ऐतिहासिक रॅली ३० मे रोजी जळगावहून निघणार

rally

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातून ३० मे रोजी निघणाऱ्या ऐतिहासिक वाहन रॅलीसाठी डॉ केतकीताई पाटील फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन तर्फे संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. ३०० किलोमीटर अंतराची आणि ३०० चारचाकी वाहनांची ही भव्य रॅली समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे.

---Advertisement---

या रॅलीच्या नियोजनासाठी आज डॉ केतकी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष बैठक पार पडली. या बैठकीस गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आणि भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ सौ. केतकीताई पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. या बैठकीत रॅलीचे तपशील, मार्ग, वाहन व्यवस्थापन, सहभागी प्रतिनिधींना सूचना आणि जनजागृती यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

केतकीताईंनी ‘केतकीताई मित्र परिवार’ व गोदावरी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना आवाहन केले की त्यांनी या ऐतिहासिक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करावे. रॅलीच्या यशासाठी प्रत्येक सदस्याने जबाबदारीने काम करावे असेही त्यांनी नमूद केले.

या भव्य रॅलीचे नेतृत्व राज्याचे लोकप्रिय नेते व मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात ही रॅली सामाजिक एकात्मता आणि ऐतिहासिक गौरव यांचा संगम ठरणार आहे.

बैठकीस उपस्थित मान्यवर भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील,भाजपा महानगर सरचिटणीस तथा दुध संघांचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे मा. महामंत्री सुभाष सोनवणे, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर बोर्डिंग चे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे,डॉ. संजय पाटील,धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, मल्हार सेनेचे मा. जिल्हाप्रमुख अरुण ठाकरे, धर्मराज सोनवणे,रामचंद्र चऱ्हाटे,धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, दिलीप नाझरकर, कुणाल सुलताने,दिलीप कवडे,संतोष कचरे, डिंगबर सोनवणे, प्रवीण पवार,सचिन धनगर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
३०० किलोमीटर अंतर
३०० चारचाकी वाहने
सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जागृती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment