जळगाव जिल्हा

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज, हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरतर्फे सुवर्ण प्राशन संस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे मोफत सुवर्ण प्राशन संस्कार पुष्यनक्षत्रावर दि १८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव भुसावळ महामार्ग जळगाव खुर्द येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर येथे हा कार्यक्रम दि १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात असल्याची माहिती अधिष्टाता डॉ हर्षल बोरोले यांनी दिली आहे.नवजात बालकापासून १६ वर्षाची मुल-मुली आजारी पडत असतील,मुलांची शारीरीक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल,मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर यावर उपाय म्हणून डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरने दोन थेंब बाळाला द्या सुर्वणप्राशनाचे वरदान लाभेल

आरोग्य व बौध्दीक विकासाचे हे अभियान आयोजित केले आहे. आयुर्वेदातील १६ संस्कारापैकी महत्वाचा असा एक संस्कार असून तो पुर्वपरंपरागत प्रत्येक बालकांना त्याच्या जन्मापासून १६ वर्षापर्यंत केला जातो. पुष्य नक्षत्राला हे सुर्वण प्राशन करण्याचे महत्व असते.शास्त्रोक्त पध्दतीने हे संस्कार होण्यासाठी डॉ.निखिल चौधरी, डॉ कोमल खंडारे, डॉ. साजीया खान, डॉ.मुकेश चौधरी, डॉ पालवी चौधरी अशी तज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी ० ते १६ बालकांसह सुवर्ण प्राशन संस्कारात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोहीत येवले यांच्याशी ८८८८१३१६१९, ९११२८१२८५० क्रमांकवर संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button