डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

एप्रिल 14, 2026 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

d1

तसेच मेणबत्ती प्रज्वलीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके संचालक डॉ. एन एस आर्वीकर, रजिस्टर प्रमोद भिरूड, संगणक विभागाचे भूषण चौधरी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगण्याचे माध्यम असलेल्या संविधानाची निर्मिती करून समाजातील वंचित घटकांना न्याय दिला.

देशातच नव्हे तर जगातील अनेक मोठ्या राष्ट्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती आजही जतन करून ठेवलेले दिसून येतात. आजच्या जयंतीच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गोदावरी फाउंडेशन तर्फे विनम्र अभिवादन करत असल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now