जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षपदी डाॅ. सोरडे

फेब्रुवारी 23, 2022 6:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२। जिल्हा पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी रविवारी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. सन २०२२ ते २०२४ या दोन वर्षासाठी पत्रकार संघाची कार्यकारिणी व विश्वस्त मंडळ यांची निवड करण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. गोपी सोरडे यांची निवड करण्यात आली. ही निवड जळगाव जिल्हा पत्रकार संघ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली.

reporter 1

या कार्यकारिणीत विश्वस्त जमनादास भाटिया, नरेंद्र नेहेते, कार्यवाह अशोक भाटिया, विश्वस्त अनिल पाटील, राजशेखर चौधरी, दिलीप तिवारी, शांता वाणी, निमंत्रित विश्वस्त डॉ. युवराज परदेशी, मुकूंद एडके, दिलीप शिरुडे तर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. गोपी सोरडे, ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी (पारोळा), उपाध्यक्ष चरणसिंग पाटील, देविदास वाणी, मनोज बारी, राजेश यावलकर, सचिन सोमवंशी, मोतीलाल अहिरे, कार्याध्यक्ष प्रमोद भिमसिंग पाटील (कासोदा), सरचिटणीस पाडुरंग महाले, सहचिटणीस संजय निकुंभ, मोरेश्वर राणे, प्रोजेक्ट चेअरमन मनीष पात्रिकर, खजिनदार फारुख शेख, परिषद प्रतिनिधी माजी अध्यक्ष दिलीप शिरुडे, पत्रकार भवन समिती अध्यक्ष लेखराज उपाध्याय, सचिव सारंग भाटिया, चाळीसगाव तालुका अध्यक्ष मंगेश शर्मा, पत्रकार प्रबोधन समितीवर शेखर पाटील, डॉ. सुधीर भटकर, दिलीप तिवारी, युवराज परदेशी, ज्येष्ठ पत्रकार समितीत शिवलाल बारी, अविनाश पात्रिकर, दिनेश दगडकर, केदारनाथ दायमा, ज्येेष्ठ पत्रकार मुंबईचे प्रतिनिधी कमलाकर वाणी आदींची निवड करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now