जळगाव जिल्हा

डॉ. अनघा चोपडे यांनी अवघ्या २७ तासात पार केली ६०० किमी सायकल स्पर्धा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रेवेट्स दे रंडोनीऊर मंडियाक्स (BRM) या ६०० किमी लांब पल्ल्याच्या इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंटमध्ये जळगाव सायकलिस्ट क्लबच्या सदस्य डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग नोंदविला व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. डॉ. अनघा चोपडे यांनी केवळ २७ तास ४६ मिनिट ९ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.

औडाक्स इंडिया परिशियाई मार्फत नांदेड येथे ब्रेवेट्स दे रंडोनीऊर मंडियाक्स (BRM) ६०० किमी लांब पल्ल्याच्या इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जळगाव सायकलिस्ट क्लबच्या सदस्य डॉ. अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत ६०० किमी सायकलिंगसाठी ४० तासाचा कालावधी देण्यात आला होता. डॉ. चोपडे यांनी २७ तास ४६ मिनिट ९ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली.

जिल्यातील पहिल्याच महिला सायकलिस्ट
६०० किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग नोंदवून ती यशस्वीपणे पार पाडणाऱ्या डॉ. अनघा चोपडे या जळगाव जिल्यातील पहिल्याच महिला सायकलिस्ट आहेत.  नांदेड येथील वाझिराबाद येथून सकाळी ६.४० ला स्पर्धेची सुरवात झाली होती. मेडचल येथून परतीचा प्रवास केला आणि नांदेड क्लब येथे फिनिशर्स पॉईंटवर प्रवास संपविला. नांदेड सायकलिस्ट क्लबचे आयोजक आणि सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व केक कापून स्वागत केले.

डॉ. सुयोग चोपडे यांचे लाभले मार्गदर्शन
लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी जोरदार तयारी लागते. त्याकरिता आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन डॉ. सुयोग चोपडे यांनी केले. डॉ. अनघा चोपडे यांनी आतापर्यंत BRM 200 ही स्पर्धा २ वेळा, BRM 300 किमी आणि BRM 600 किमी यशस्वी रित्या पार पडली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button