⁠ 
सोमवार, मे 27, 2024

आता गुलाबराव पाटलांना परत पानटपरीवर बसवायची वेळ आलीय ; संजय राऊतांचा निशाणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या मतदारसंघातील उमेदवारांचे आज बुधवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सगळ्यात मोठी गद्दारी जळगाव जिल्ह्यात झाली असून अडीचशे खोके घेऊन घरात बसून आता आपली सभा ऐकत आहेत. पण आता महाराष्ट्र पवित्र करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांनी पान टपरीवाल्याला आमदार, मंत्री केले. पण आता या पान टपरीवाल्याला घरी बसविण्याची वेळ आली असल्याचे म्हणत; राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

निवडणूक होईपर्यंत तुतारी आणि मशाल घराघरात पोहोचवा. गद्दारांना निष्ववंतांची ताकद काय असते हे दाखऊन द्या. महाराष्ट्र लुटायचे म्हणून भाजपने दोन पक्ष फोडले. मात्र त्यांना आता ४०० पार नाही, तर आम्ही तडीपार करेल. चारशे पार करायचे कि नाही हे जनता ठरवेल. आम्हाला जेलमध्ये टाकले नंतर तुमचा नंबर आहे. मोदी देश भर गॅरंटी देत आहेत. पण तुम्ही विजय होणार का त्याची गॅरंटी नसल्याचे म्हणत राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.