जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.नदीम जहूर अहमद शेख यांना डॉक्टरेट पदवी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.नदीम जहूर अहमद शेख यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.

डायाफेन्थ्यूरॉन कीटकनाशकांचा ड्रॉसॉफिला प्रजातींवर जीनोटॉक्सिसिटी मूल्यांकन. वापरलेली साहित्ये :जिवंत संस्कारित ड्रॉसॉफिला प्रजाती, कीटकनाशके – डायाफेन्थ्यूरॉन, केलेली चाचणी – अळ्या पासून गुणसूत्रीय अभ्यास, प्रौढ उपचार माशांपासून जीन ट्रान्सक्रिपटॉम विश्लेषण.हा त्यांच्या संशोधनातील भाग असून त्यांना डॉ. मनोज कुमार झेड. चोपडा, एम.जे. कॉलेज, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले.

उत्तर महाराष्ट्र विदयापिठाने त्यांच्या या संशोधनाची दखल घेवून त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. संशोधनाचे निष्कर्ष – स्तनाचा कर्करोग, ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी, बेकर मस्क्युलर डिस्ट्रॉफी, प्रोस्टेट कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग, कॉफिन-सिरिस सिंड्रोम संबंधित जीन कीटकनाशकांमुळे प्रभावित होतात. त्यांनी नुकतीच माजी खा.संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली.

डॉ. उल्हास पाटील यांनी देखिल डॉ नदीम यांचे अभिनंदन केले असून भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्‍त केल्यात. त्यांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशन मध्ये जल्‍लोष व्यक्‍त केला जात असून उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ अक्षता पाटील, डॉ . अनिकेत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button