बळीराम पेठेतील डॉक्टर बेपत्ता, शहर पोलिसात तक्रार
जळगाव लाईव्ह न्यूज | ५ एप्रिल २०२३ | जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ सुरेश बागुल हे दि.४ एप्रिल रोजी घाणेकर चौकातून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बळीराम पेठ परिसरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ सुरेश कडू बागुल वय – ७६ हे दि.४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एका रुग्णाला बघण्यासाठी दवाखान्यातील कंपाऊंडर रोहित सुरेश चौधरी याच्यासोबत गेले होते. रुग्णाला पाहून दोघे रिक्षाने घाणेकर चौकात आल्यावर डॉ.बागुल हे उतरले व मला काम आहे मी नंतर येतो असे त्यांनी कंपाऊंडरला सांगितले. रात्री उशिरापर्यंत वाट पाहिल्यावर देखील ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला.
इंद्रजित सुरेश बागुल यांच्या फिर्यादीवरून बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीचे दाखल अंमलदार ललित भदाणे हे असून तपास रविंद्र सोनार करीत आहेत.