जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । गेल्या दोन तीन वर्षात सोन्याचे दर प्रचंड वाढले आहे. सोने महागले असले तरी लोक गरजेनुसार सोने खरेदी करीत असतात. त्यात देशात सणासुदीला सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. सध्या देशात गणेश चतुर्थीपासून सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. त्यामुळे या काळात बरेच जण सोने खरेदी करतात. आणि आतापासून ते सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र सध्या सोन्याच्या भावात सुरु असलेली चढ-उतारामुळे ग्राहकांच्या मनात किमतीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
आता दिवाळी आणि धनत्रयोदशीपर्यंत सोन्याच्या भावात घसरण होणार की वाढणार हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवारी MCX वर सोन्याचा भाव 50,384 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. अशाप्रकारे गेल्या धनत्रयोदशीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाली आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, ओरिगो ई मंडीचे कमोडिटी रिसर्चचे असिस्टंट जनरल मॅनेजर तरुण तत्सांगी म्हणतात की, सराफा बाजारात सोन्याची किंमत 46,000 रुपयांपर्यंत येऊ शकते. याचे कारण देताना तरुण सांगतो की, सध्या जागतिक आणि देशांतर्गत बाजारात असा कोणताही घटक दिसत नाही, जो सोन्याच्या किमतीला आधार देईल. यापूर्वी रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सोन्याचे भाव वाढले होते, मात्र आता या तणावाचा परिणामही दूर झाला आहे.
मंदी असली तरी सोन्याच्या किमतीवर परिणाम होणार नाही
युरोप आणि अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता असल्याचे तरुण सांगतात. पण मंदी असली तरी सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार नाही. ते म्हणाले की, 2008 मध्ये आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी बहुतांश देश तयार नव्हते. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम झाला. परंतु यावेळी बहुतेक देशांनी मंदीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.