⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्कार‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । महाराष्ट्र दिना निमित्त क्रीडा व युवक सेवा‎ संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे‎ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी‎ कार्यालयातर्फे समर्थ बहुउद्देशीय‎ संस्थेला (जवखेडे बुद्रूक , ता.‎ एरंडोल) जिल्हा युवा पुरस्काराने‎ पालकमंत्री गुलाबराव पाटील व‎ जिल्हाधिकारी अभिजित राऊत‎ यांनी महाराष्ट्र दिनी सन्मानित‎ केले.

या पुरस्कारासाठी समर्थ‎ बहुउद्देशीय संस्थेला रमेश जाधव,‎ अभिमन कोळी, कलावती भोई,‎ विजय कोळी, अध्यक्ष योगेश‎ लांबोळे, उपाध्यक्ष महेश कोळी,‎ सचिव विशाल जाधव, अमोल‎ जाधव, रोहिणी निकम, भावेश‎ पाटील आदीचे विशेष सहकार्य‎ लाभले.‎
जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित समर्थ बहुउद्देशीय संस्था सदस्य.‎