डिस्ट्रीक्ट वाईन असोशिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

सप्टेंबर 24, 2021 2:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील मद्यव्यावसायिकांच्या शुक्रवार दि.१७ रोजी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीस जिल्हाभरातील १२५ अनुज्ञप्तीधारक किरकोळ मद्य व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला.

Untitled design 91 jpg webp

बैठकीत जिल्हाध्यक्षपदी ऍड. रोहन बाहेती, सचिवपदी पंकज जंगले, कोषाध्यक्षपदी डॉ.मणिलाल चौधरी, उपाध्यक्षपदी उदय पवार, जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी राजेंद्र चौधरी तर जळगाव शहर अध्यक्षपदी सतीश नारखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीला शंकर मराठे (जामनेर), सुरेश मराठे (पाचोरा), प्रमोद भंगाळे (भुसावळ), भडगाव येथील श्री.महाजन, पंकज जंगले, मनीष बाहेती, ललित पाटील, नितीन पंजाबी आदी उपस्थित होते. बैठकीत नूतन पदाधिकारी निवडीनंतर व्यवसायात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना कशा कराव्यात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन असणे का गरजेचे आहे यावर सुनिल भंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ऍड. सत्यजित पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यवसायातील अडचणी तर सोडवायच्या असतील, तर एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन मनीष बाहेती यांनी केले तर आभार पंकज जंगले यांनी मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now