गुन्हेजळगाव जिल्हा

घृणास्पद : १३ वर्षीय मुलीवर अत्याचार ; ५ जणांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । साक्री तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचार करणार्‍यांसह मदत करणारे आणि बघ्याची भूमिका घेणाऱ्या एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी कि, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय मुलगी मध्यरात्री नैसर्गिक विधीसाठी उठल्यानंतर संशयित किशोर पंडित सूर्यवंशी, छोटू उर्फ प्रशांत रतीलाल बागुल, चेतन भटू बागुल, संदेश रामदास साबळे यांनी मुलीचे तोंडू दाबून तिला उचलून शेतात नेले. त्यानंतर शेतातील विहिरीजवळ असलेल्या झाडाजवळ प्रशांत व चेतन बागुल यांनी मुलीवर अत्याचार केला. यावेळी किशोर व संदेश यांनी मुलीला पकडून ठेवले होते.

दरम्यान, पीडिता प्रतिकार करत असताना तिचा आवाज ऐकून जयेश नेहरू सूर्यवंशी हा तेथे आला होता परंतु चौघांना विरोध न करता तो तेथून निघून गेला. पीडितेने कुटुंबाला माहिती दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून साक्री पोलिस ठाण्यात विविध कलमांसह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button