जळगाव युवासेनेची जिल्हा आढावा बैठक संपन्न; विविध विषयांवर झाली चर्चा..

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव (Jalgaon) युवासेनेच्या (Yuva Sena) वतीने २६ जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील (Gulabrao Patil) यांच्या मार्गदर्शनात, युवासेना कार्यअध्यक्ष पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik), यांच्या सुचनेनुसार शिवसेना (Shiv Sena) जळगाव जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे मुंबई येथुन आलेले युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक डॉ. प्रथमेश पाटील व जळगाव जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा, यांच्या अध्यक्षतेत युवासेना जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने युवासेना जळगाव जिल्ह्यात संघटन वाढीवर लक्ष केंद्रीत करणे, तसेच युवा विजय महाराष्ट्र दौरा असेल तसेच प्रत्येक महाविद्यालय निहाय युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख व सहाय्यक पदांच्या नियुक्ती करणे, युवासेना सदस्य नोंदणी करवणे, आगामी काळात येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने युवांना तयारी करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्याप्रकारे कार्यशिबिरांचे आयोजन करणे तसेच, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढणे यासाठी प्रत्येक महाविद्यालयात युवासेना टिम तयार करण्याच्या सुचना यावेळी युवासेना उ. महाराष्ट्र समन्वयक डॉ. प्रथमेश पाटील यांनी दिल्या.
युवासेना बैठकीला जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख संतोष पाटिल व वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख डॉ. मोईज देशपांडे यांनी बैठकीला धावती भेट देत संबोधन करत युवासेना टिमला शुभेच्छा दिल्या.
शिवसेना जिल्हा कार्यालयात झालेल्या युवासेना बैठकीला युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी दुरध्वनी संभाषणद्वारे उपस्थितांना संबोधित केले तसेच उ. महाराष्ट्र समन्वयक डॉ. प्रथमेश पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा, जिल्हाध्यक्ष (पाचोरा) जितेंद्र जैन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, धुळे युवासेना महानगर प्रमुख योगेश मराठे आदींनी बैठकीत संबोधन केले.
बैठकीला युवासेनेचे सचिन सोनार(युवासेना जिल्हा संघटक), सागर हिवराळे(युवा सेना जिल्हा सरचिटणीस), शंतनू नारखेडे (उपजिल्हाप्रमुख युवासेना), यश सोनवणे (युवासेना महानगर प्रमुख), दिपक भदाणे(युवासेना तालुका प्रमुख), दानिश पठाण (अल्पसंख्यांक प्रमुख) , गौरव महाजन, प्रविण बिर्हाडे, आकाश जाधव, वैद्यकीय मदत कक्षाचे दिपक पाटील, विशाल निकम आदींसह युवासैनिक-शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.