महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रविवारी जिल्हा बैठक

ऑक्टोबर 7, 2022 11:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव जिल्ह्याची बैठक रविवार दि. ९ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता जळगावात नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह विविध शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि मुख्य कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले आहे.

anis jpg webp

बैठकीमध्ये निरीक्षक म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य प्रकल्प विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी आणि राज्याचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे हे उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये नागपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त मांडले जाणार आहे.

यासह अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या देणग्या संकलन, जिल्ह्यात पार पडलेल्या शिबिरांचा आढावा तसेच शाखेच्या साप्ताहिक बैठक व कामांचा आढावा घेतला जाणार आहे. शाखा भेटींचे नियोजन केले जाणार आहे.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, विश्वजीत चौधरी, अशोक तायडे, मोहन मेढे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now