युवासेनेची रविवारी जिल्हास्तरीय बैठक!
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासाठी, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या आदेशाने, रविवार दि. ७रोजी दुपारी १२वा. सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) जळगाव येथे युवासेनेची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव व रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुका, विधानसभा येथील सर्व युवासेना पदाधिकारी, युवासैनिक यांनी बैठकीसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यासह युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया व युवासेना विस्तारक किशोरजी भोसले, चैजन्यजी बनसोडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.