⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

दुचाकीला घ्या मनपसंत क्रमांक, २७ जानेवारीपासून नवीन क्रमांकाची मालिका सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेस २७ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे २४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र कार्यालयात सादर करावे. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. २५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लिफाफे उघडण्यात येतील. जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल. उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील.

हे देखील वाचा :