---Advertisement---
जामनेर

विश्वरूद्र फाउंडेशनतर्फे ७५ शिक्षकांना जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

---Advertisement---

Jamnaer News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । भारत सरकार नोंदणीकृत विश्वरूद्र फाउंडेशन संचलित विश्व ह्यूमन राइट्स, पोलीस मित्र, नारीशक्ती, पत्रकार व ग्राहक संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या तर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात होते. शेतकरी संघ जामनेर भुसावळ रोड छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचा हॉल, जामनेर येथे दि. 09 ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. यात जळगाव जिल्ह्यामधून 75 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चे मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

jalgaon 2022 10 12T154737.179


कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच प्रमुख पाहुणे, नानाभाऊ बाविस्कर ( उपनगराध्यक्ष जामनेर ), नवल पाटील ( माजी सभापती पंचायत समिती),
भगवान खंडू कोळी साहेब ( पी.आय नंदुरबार ), मा.श्री. डॉक्टर विकास पाटील ( आरोग्य अधिकारी म न पा जळगाव ), पंकज नाले ( समाजसेवक जळगाव ) विजय सरडे ( शिक्षण अधिकारी जामनेर ) व विश्वरूद्र फाउंडेशन संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रिकांत मोरे , महाराष्ट्र राज्य महासचिव, रविंद्र शिवदास सूर्यवंशी, तसेच ऋषिकेश जाधव , दीपक पाटील, अमेय कुलकर्णी, किशोर पाटील हे उपस्थित होते.

---Advertisement---


कार्यक्रम संपन्न करण्यासाठी जामनेर तालुक्यातील तालुकाध्यक्ष मीरा राठोड, आशाताई पाटील , प्रेम कथा पांडे, उज्वला चौरे , भाग्यश्री लुंकड, रेखा जैन, ज्योती इंगळे, रेखापाळे, सुनीता सपकाळे, ज्योती इंगळे, संगिता पाटील, शोभा तायडे, निरंजना तायडे, यांनी सर्वांनी कार्यवाही यशस्वी करण्याची मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव येथून प्रसिद्ध सूत्रसंचालना साठी असलेले उमा बाबुल यांनी केले, कार्यक्रमाला आलेल्या सर्व शिक्षकांना सर्टिफिकेट सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---