खाजगी प्राथमिक महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या जळगाव जिल्हाल्याचे नूतन कार्यकारिणी सदस्यांची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अजित चौधरी यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जीवन महाजन सचिव व राकेश पाटील यांची कार्याध्यक्ष, महेंद्रसिंग पाटील उपाध्यक्ष, मनोज पाटील उपाध्यक्ष, सलिम तडवी सहसचिव, योगेश चौधरी सहसचिव, अमोल भारंबे कोषाध्यक्ष, देविदास काळे हिशोब तपासनीस, वना महाजन संघटन मंत्री, विक्रमादित्य पाटील मुख्याध्यापक प्रतिनिधी, देवेंद्र चौधरी शिक्षकेतर प्रतिनिधी, अख्तर उद्दिन काझी उर्दू प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
कार्यकारणीची निवड अशोक मदाने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. तर निवडणूक अधिकारी म्हणून एम व्हीं पाटील, श्याम ठाकरे यांनी काम पाहिले. या प्रसंगी टी.के.पाटील उपस्थित होते.
सदर निवडीसाठी राज्य अध्यक्ष का.र.तुंगार, राज्य सचिव प्रकाश देशपांडे, आय.जी.माळी, सी.पा.पाटील, नखोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पाटील, प्रसन्न बोरोले, भूपेंद्र पाटील, कैलास पाटील, गोविंद लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.