⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जिल्हा बँक निवडणूक : चाळीसगावात ९७ टक्के मतदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगावात जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांनी मतदानाचे हक्क बजावले आहे. दरम्यान १८२ पैकी १७६ दात्यांनी मतदान केल्यामुळे एकूण ९७ टक्के मतदान झाले.

जिल्हा बँक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकल्याने अकरा जागा ह्या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १० जागांसाठी मतदान प्रक्रिया हि रविवार रोजी राबविण्यात आली. यात चाळीसगावात विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील यांनी रिंगणात उडी घेतली होती. मात्र, विविध कार्यकारी सोसायटी गटातून सहकार पॅनलने प्रदिप देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.

भाजपाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे बिनविरोधची माळ प्रदीप देशमुख यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटी गटातून सहकार पॅनलने प्रदिप देशमुख यांची बिनविरोधावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याअनुषंगाने राखीव जागांसह इतर संस्था वैयक्तिगत सभासद मतदार संघासाठी मतदान एच.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात रविवार रोजी सकाळी ८ वाजेपासून तर दुपारी ४ वाजेदरम्यान घेण्यात आले. यावेळी १८२ पैकी १७६ दात्यांनी मतदान केले. यामुळे एकूण ९७ टक्के मतदान झाले आहेत. मतदानावेळी उत्साहाचे वातावरण दिसून आले.