Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

पाणीपुरवठा योजनेचे सरपंचाना मान्यता पत्र वाटप!

water schem
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
February 23, 2022 | 3:45 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेर मतदारसंघातील अनेक गावांना आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने यातील 15 गावांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र संबधीत गावाच्या सरपंचाना जळगाव येथे वाटप करण्यात आले.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या प्रशासकीय मान्यता वितरित करण्यात आल्या. अमळनेर मतदारसंघातील अंबारे- खापरखेडा, कोंढावळ, हिंगोणे बु, ढेकु सिम, रुंधाटी, नांदगाव, वाघोदे, कावपिंप्री, लोण सिम, लोण खुर्द, सोनखेडी, दापोरी बु, लोण चारम, झाडी, शेवगे बु व दळवेल इत्यादी गावांच्या उपस्थित सरपंच व इतर पदाधिकारी यांना हे मान्यता पत्र देण्यात आले. यावेळी सर्वांनी पालकमंत्री व आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा – आ.अनिल पाटील

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात आर्थिक तुटवडा असताना देखील जीवन प्राधिकरण व येथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी मोठा निधी मिळवला, म्हणूनच मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजनांना निधी मिळाला आहे. यापूर्वी कधीतरी कामे मंजूर होऊन सरपंचाना याचा पत्ताही राहत नव्हता, थेट एजन्सी गावात काम करण्यासाठी आल्यानंतर गावाला योजनेची माहिती होत होती. पण भाऊंनी एक वेगळा पायंडा पाडत एकाच वेळी अनेक सरपंचाच्या हातीच प्रशासकीय मान्यता ठेवल्याने हा दिवस नक्कीच सुवर्ण अक्षरांनी ठेवण्यासारखा आहे. लवकरच या गावांची टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामही सुरू होणार आहे. पुढील टप्प्यात इतर प्रस्तावित गावांना देखील याच पद्धतीने प्रशासकीय मान्यता दिल्या जातील अशी ग्वाही देत सदर योजनांच्या मंजुरीबद्दल मतदारसंघाच्या वतीने आमदारांनी पालकमंत्र्याचे विशेष आभार व्यक्त केले. तर पालकमंत्रीनी देखील आमदारांना आपल्या मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांबद्दल असलेल्या कळकळीचे कौतुक केले.

  • राज्यमंत्री बच्चु कडु उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे दौऱ्याचे नियोजन
  • जुन्या वादातून ७७वर्षीय वयोवृद्धाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
  • प्रवाशांनो लक्ष द्या : मनमाड-मुंबई, जनशताब्दी गाड्या रद्द
  • विज पडुन जिवीत हानी होऊ नये यासाठी ‘दामिनी’ ॲप डाउनलोड करा
  • मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई : 15 लाखांचा गुटखा केला नष्ट

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, अमळनेर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
jhund

Jhund Trailer: बहुचर्चित ‘झुंड’चा ट्रेलर पाहिलात का?

nivedan 12

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला कठोर शिक्षा द्या : तेली समाज

exam

10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाइन? सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.