⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

महामानवांच्या जयंतीनिमित्त बांभोरी येथे शालेय साहित्याचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । बांभोरी गावाचे सरपंच सचिन बिऱ्हाडे व भीम ज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुशिष्य जयंती निमित्त बांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुं सपकाळे, प्रमुख अतिथी म्हणुन धरणगाव पं.स.माजी सभापती मुकुंद नन्नवरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत ठाकूर, विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, कास्ट्राईबचे संघटनेचे रमेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुकुंद सपकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो वाघाप्रमाणे गुरगुरेल ” या बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रास्ताविक सचिन बिऱ्हाडे यांनी तर सुत्रसंचलन सुरेश नन्नवरे यांनी करुन आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर साळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका उषाबाई सुर्यवंशी, शाळेतील शिक्षकवृंद मनीषा पाटील, वृंदा गरुड व भीमज्योत मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.