⁠ 
बुधवार, मे 1, 2024

‘जिथे शाळा, तिथे वृक्ष’ या मोहिमेअंतर्गत चोपडा शहरातील विविध शाळांमध्ये रोपांचे वितरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. आणि निवारा मिळवण्यासाठी मनुष्य किती प्रयत्न करतो हा प्रश्न निर्माण होतो. परंतु आता पावसाळी ऋतू ला सुरवात झाल्याच अवचित्त साधत नागरिकांचा कल हा वृक्षारोपणाकडे वळला आहे. तसेच जिथे शाळा, तिथे वृक्ष’ या मोहिमेअंतर्गत चोपडा शहरातील विविध शाळांमध्ये रोपांचे वितरण करण्यात आले.

‘जिथे शाळा, तिथे वृक्ष’ या मोहिमे अंतर्गत शहरातील विविध शाळांना देशी वाणाच्या व प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली, या मध्ये निम, पिंपळ, सेलम, पापडी, करंज या रोपांचे वितरण करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे भगिनी मंडळ शैक्षणिक संकुल व इनरव्हील क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मंचावर भगिनी मंडळ या संस्थेच्या तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष पुनम गुजराथी, सचिव मीना पोतदार यांच्यासह माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, इतर उपस्तित होते. या दरम्यान  केवळ वृक्ष लागवडीचे सोहळे होऊ नयेत तर लावलेल्या रोपांच्या वाढदिवसाचे सोहळे मोठ्या उत्साहात साजरे होतील यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. इनरव्हील कल्बतर्फे देण्यात येणाऱ्या रोपांचे ऑडिट केले जाईल. प्रत्येक शाळेने झाडांचे पालकत्व स्वीकारावे. शिक्षकांनी व मुलांनी झाडे दत्तक घ्यावी, असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी यांनी मनोगतात सांगितले.