पूर्वेश सरनाईक व प्रथमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप

डिसेंबर 29, 2024 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर रोजी युवासेना जळगाव तर्फे पूर्वेश सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष व प्रथमेश पाटील युवासेना समन्वयक उत्तर महाराष्ट्र यांनी वाढदिवसानिमित्त प पर्यावरणाची हानी होईल असे बुके व बॅनर न स्वीकारण्याचा संकल्प केला होता. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक बाबी कराव्यात असा माणस दाखविला.

purvesh sarnaik

याचे अवलोकन करून युवासेना जळगाव जिल्हा तर्फे अभिनव विद्यालय प्रतापनगर जळगाव येथील २५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात आले तसेच ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान येथे २०० गरजूंना अन्नदान करण्यात आले. यावेळी रोहित कोगटा जिल्हाध्यक्ष युवासेना जळगाव यांनी शालेय विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन केले. ॲड.बबन बाहेती प्रतिष्ठान जळगाव येथे सुमारे २०० गरीब व गरजूंना भोजनाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जितेंद्र गवळी सचिव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र, युवासेनचे सन्माननीय पदाधिकारी सचिन सोनार,शंतनू नारखेडे ,पवन ठाकूर,प्रवीण बिऱ्हाडे, आकाश जाधव,अविनाश पाटील ,नीरज वाणी ,दिपक पाटिल, विशाल निकम विजय यादव ,विवेक बारी ,राकेश सोनवणे, सागर हिरवाळे, सनी सोनार, यश सोनवणे उपस्थित होते. यावेळी श्री पूर्वेशजी सरनाईक व श्री प्रथमेशजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा व सर्व उपस्थित युवासेना पदाधिकारी जळगाव यांनी विद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या व लेखन साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नीता पाटील यांनी केले व संतोष सपकाळे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमासाठी प्राथमिकचे मुख्याध्यापक हेमंतपाटील, माध्यमिक चे मुख्याध्यापक सरोज तिवारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now