पुरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

सप्टेंबर 18, 2021 1:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्त पांच गावामधील शालेय विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

New Project 5 jpg webp

काही दिवसांपूर्वी अतिृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेती सोबतच अनेक विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यदेखील वाहून गेले. अशा स्थितीत विद्यापीठाच्यावतीने पुरग्रस्त भागातील २१ गावांमधील ३०५ घरांचा सर्व्हे करण्यात आला. रोकडेगाव, रोकडेतांडा, हातले, मजरे, वाकडू व पिंपरखेड आदी गावातील २५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने पांच वहया, पेन्सील, पेन, खोडरबर, उजळणी पुस्तक व फोल्डर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, अधिसभा सदस्य अमोल पाटील, रासेयोचे संचालक प्रा.पंकजकुमार नन्नवरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.किशोर पवार, प्रा.डॉ.राहुल कुळकर्णी, प्रा. प्रशांत कसबे, मनोज कापडणे, सारंग पाटील, दीपक पाटील, रितेश महाजन, आकाश धनगर, ज्ञानेश्वर उद्येवाल तसेच ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालक सुभाष पवार यांनी केले. डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी आभार मानले. कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी व आजीवन अध्ययन विस्तार सेवा विभागाचे प्रभारी संचालक प्रा. मनीष जोशी यांच्या प्रयत्नांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठाने हे पाऊल उचलले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now