पाणी भरण्याच्या वादातून एकावर विळ्याने हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । यावल तालुक्यातील डोणगाव येथे पाणी भरण्याच्या वादातून एकावर विळ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 81 jpg webp

डोणगाव येथील अनिल चुडामण पाटील यांच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला असून त्यांनी याबाबत यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक नळाला पाणी आले. घराशेजारील रहिवासी धनराज पाटील हे विजेची मोटार लावून पाणी भरत होते. बराच वेळ झाला तरी ते पाणी भरत असल्याने त्यांनी धनराज पाटलांना याबाबत विचारणा केली. त्याचा राग येऊन धनराज पाटील यांनी अनिल पाटील यास शिवीगाळ केली. भांडण सुरू असताना त्याचा मुलगा विशाल पाटील याने घरातून विळा आणून अनिल पाटील यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हातावर तसेच डाव्या डोळ्याच्या खाली जखमा झाल्या. या प्रकरणी अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून धनराज शेनपडू पाटील, विशाल धनराज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now