जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । दारू प्यायला सोबत बसले, आपसात दारूचे पैशांच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश सुर्यकांत खुपसे (वय ३५) रा. शिरपूर कन्हाळा रोड, गोविंद कॉलनी भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. १० जून रोजी दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास उमेश खूपसे हा सुरज कोळी आणि मयूर कोलते रा. मातृभूमी चौक, भुसावळ यांच्यासोबत दारू पिण्यासाठी बसला होता. दरम्यान, आपसात दारूचे पैशांवरून वाद झाल्याने सुरज कोळी आणि मयूर कोलते यांनी उमेशला बेदम मारहाण केली. यात मयूरने बिअरची बाटली तोंडावर आणि डोक्यावर मारली. यात उमेश खुपसे हा जखमी झाला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमाकांत पाटील करीत आहे.