Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक आहे.या बँकेत धानोरासह १५ ते २० खेड्यातील ग्रामस्थांची हजारो खातेदार आहेत.पण बँक व्यतिरिक्त अन्य ठिकाणांहून पैसे निघत नसल्याने खातेदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.सदर प्रकार या बँकेत गेल्या पाच महीन्यांपासुन सुरु आहे.यापुर्वी गावातील मिनी बँक,अन्य ठिकाणांहून आधारकार्ड क्रमांक टाकुन अंगठा ठेऊन पैसे निघत होते.
याबाबत सविस्तर असे की,गावात एकच राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक आहे. यामुळे जवळजवळ सर्वच खातेदारांचे आर्थिक व्यवहार याच बँकेतुन चालतात. यामध्ये शेतकरी,व्यावसायिक,दुकानदार,कृषीचालक आदींची खाते असुन विद्यार्थी,लहान खातेदार सोबत अबालवृद्ध,दिव्यांग यांची मासिक पगार खातेही याच बँकेत आहे.दुसरीकडे निवृत्तीवेतन घेणारे जेष्ठ नागरीक ही याच बँकेतुन व्यवहार करतात.पण गेल्या पाच महीन्यांपासुन फक्त बँकेतच पैसे निघत आहे.बँक व्यतिरिक्त अन्य ठिकाणी आधारकार्ड क्रमांक टाकून,अंगठा ठेऊन २० हजार पर्यंत पैसे निघत होते.पण बँकेने ही सुविधा बंद केल्याने खातेदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.तरी बँकेने पर्यायी व्यवस्था करुन द्यावी,अशी मागणी खातेदार वर्गातुन होत आहे.
अबालवृद्ध,दिव्यांगाची चक्क थट्टा
एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे.अबालवृद्ध,दिव्यांग यांना बँकेत पाय-या उंच असल्याने चढता येत नाही.काहींना त्रास होतो.तसेच एवढे करुनही बँकेत तासन् तास उभे रहावे लागते.आणि काम न होता माघारी फिरावे लागते.याअगोदर गावातच त्यांना अन्य ठिकाणी पैसे काढता येत होते.यामुळे या अबालवृद्ध यांची चांगलीच थट्टा बँक करत आहेकोट —
एका महीन्यात चार रविवार,दोन शनिवार शासकीय सुट्टी असते.काहीवेळा बँकेतील कनेक्टिव्हीटी बंद असते अशा वेळेस महत्त्वाचे कामाच्या वेळेला पैसे निघत नाही.यामुळे आमचे पैसे असुन आम्ही चोर झालेले आहेत, मनोहर महाजन – खातेदार धानोरा