गुन्हेजळगाव जिल्हा

घृणास्पद : मुलगा होत नाही म्हणून विवाहीतेचा छ्ळ आणि केले दुसरे लग्न !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ ।  यावल तालुक्यातील दहीगाव येथील माहेरवासी असलेल्या विवाहीत महीलेचा सासरच्या मंडळीकडुन मुलगा होत नाही व विविध कारणाने मानसिक व शारीरिक छ्ळ केला जात असल्याचे समोर आले आहे. महीलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यास पतीसह सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सोनाली उर्फ आशा दिपक पाटील, वय २९ वर्ष , राहणार दहिगाव तालुका यावल व्दारा जयराम रामदास पाटील हीचे लग्न हिन्यु धर्माच्या रितिरीवाजा प्रमाणे दिनांक ३ / ०५ / २०१८ रोजी उत्राण तालुका एरंडोल जिल्हा जळगाव दिपक सुपडू पाटील यांच्याशी लावण्यात आला होते .लग्न झाल्यापासुन सासरच्या मंडळी कड्डन काही दिवस तिला चांगली वागणुक मिळाली , पती दिपक पाटील पासुन मला एक चार वर्षाची मुलगी असुन , पती आणी सासरा सुपडु दगा पाटील, सासु सुंनदा सुपडू पाटील , नंदणसौ. रेखा संभाजी पाटील, नणंद प्रियंका हिरालाल पाटील ,मंडळीला मुलगा हवा असल्याने ही सर्व मंडळीकड्डन मुलगी होईपर्यंत या मंडळींनी सोनाली पाटील हिला चांगली वागणुक दिली . मुलगी झाल्यावर तिला सासरच्या मंडळीकड्डन मानसिक, शारीरिक त्रास देत गांजपाट करू लागले,

दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळीचा त्रास असहाय झाल्याने सोनाली ही माहेरी दहिगाव तालुका यावल येथे आली असता तिचा पती दिपक पाटील याने उंदीरखेडा तालुका एरंडोल या गावातील शारदा पाटील नांवाच्या महिलेशी विवाह केल्याचे सोनाली ही सासरवाड़ीला परत आल्यावर उघडकीस आले

सोनाली दिपक पाटील हिने यावल पोलिस ठाण्यात तिचा पती दिपक सुपडू पाटील , सुनंदा सुपडू पाटील , नंणद प्रियंका हिरालाल पाटील सर्व राहणार उत्राण तालुका एरंडोल , रेखा संभाजी पाटील राहणार भारूड तालुका चोपडा , शारदा दिपक पाटील राहणार उंदीरखेडा तालुका पारोळा यांच्या विरूद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉस्टेबल नरेन्द्र बागुले हे करीत आहे .

Related Articles

Back to top button