जळगाव जिल्हाजळगाव शहर

स्वच्छतेत मानांकन मिळविणाऱ्या जळगावच्या विद्युत कॉलनीत घाणीचे साम्राज्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, शहरातील विद्युत कॉलनीची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

स्वच्छतेवर किती खर्च होतो? शहरात निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.

देशपातळीतून शहर स्वच्छतेकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते. याकडे प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे. तसेच कॉलनीतील संपूर्ण गटारीचे सांडपाणी येथे तुंबले आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. आधीच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे.परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शहरातील विद्युत कॉलनी परिसरातील घाण तात्काळ साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button