जळगाव जिल्हाराजकारण
Big Breaking : महाजन गटाला धक्का, दूध संघावर पुन्हा खडसेंचे वर्चस्व!
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने संचालक मंडळ बाजूला करीत प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या गटातील आ.मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांची वर्णी लागली होती. दरम्यान, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे गटाकडून काही संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने निकाल दिला असून प्रशासक मंडळ बाजूला सारत पुन्हा संचालक मंडळ कायम केले आहे. आ.एकनाथराव खडसे यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’सोबत बोलताना वृत्ताला दुजोरा दिला आहे.