⁠ 
शनिवार, मे 18, 2024

संपूर्ण राज्यात वाढते आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद, मात्र…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई महानगर पालिका निवडणुकीका राज्यातील इतर निवडणूका लवकरच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी शिंदे गट आपल्या शाखा उभ्या करण्यास प्रारंभ करत आहे. यातच मुंबईतील दादरमधील शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे कामही अंतिम टप्यात आहे.

तर दुसरीकडे संपूर्ण राज्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सुरू केली आहे.कित्येकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. मात्र शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पदे देताना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तोडीस तोड उमेदवार देऊन यंदा मुंबई महानगर पालिकेवर आणि संपूर्ण राज्यातील निवडणुकांमध्ये ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेचा’ भगवा फडकवण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघील शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वरळी मतदारसंघातूनच नाही तर संपूर्ण मुंबईतून शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर कार्यकर्त्यांपासून खासदारांपर्यंत शिंदे गटात प्रवेश करत असल्याने शिंदे गटाची ताकद हळुहळु वाढत चालली आहे.