कृष्णापुरी सोसायटीच्या चेअरमनपदी धोंडू हटकर

एप्रिल 13, 2022 4:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । पाचोरा शहरातील कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी धोंडू हटकर तर व्हाईस चेअरमनपदी ओमप्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

chearman 1 jpg webp

गेल्या आठवड्यात संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चुरशीच्या लढती नंतर आजी-माजी आमदार पुरस्कृत पॅनलला पराभूत करत भाजप पुरस्कृत पॅनलने सतीश शिंदे व अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व कायम ठेवले होते. कृष्णापुरी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम दि.१३ एप्रिल रोजी पार पडला यावेळी नेहमीप्रमाणे पॅनल मधील इतर संचालकांना संधी देत पॅनल प्रमुख सतीश शिंदे यांनी चेअरमनपदी धोंडू हटकर व व्हा.चेअरमन पदी ओमप्रकाश पाटील यांची निवड करून सहकारात नवीन आदर्श निर्माण केला आहे. तसेच या सोसायटीमध्ये गेल्या २३ वर्षांपासून सतीश शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून एकीकडे सहकारात संस्था डबघाईला जात असतानाच्या काळात मात्र कृष्णापुरी सोसायटी मात्र, सतत २३ वर्षापासून पारदर्शक व आदर्श कामकाजामुळे ‘अ’ वर्ग मिळवत आहे. त्यामुळे कृष्णापुरी सोसायटीने संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळे स्थान मिळवले आहे.

यावेळी सतीष शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक दिगंबर आहिरे, शिवाजी चौधरी, हेमंत चव्हाण, शिवाजी महाजन, दिलीप नागणे, काशिनाथ पाटील, प्रकाश चौधरी, मुक्ताबाई बोरसे, सिंधुताई शिंदे, प्रेमलाल देसाई व संस्थेचे सचिव नारायण चौधरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now