---Advertisement---
बातम्या जळगाव जिल्हा रावेर

रावेर शहरात धनगर समाजाचा मेळावा उत्साहात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । रावेर शहरातील अग्रसेन मंगल कार्यालयात रविवारी धनगर समाजाचा मेळावा उत्साहात पार पडला. याप्रसंगी संभाजीनगर येथे 6 नोव्हेंबर रोजी होणारे जनआक्रोश आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

raver 1 1

धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार डॉ.विकास महात्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक लखन सावळे यांनी केले. डॉ.भगवान कुयटे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, उत्तर महाराष्ट्र संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, किसान सेल भाजपाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके यांचे भाषण झाले. डॉ.विकास महात्मे यांनी 6 नोव्हेंबर 2022 रोजी संभाजीनगर येथे होणारे जन आक्रोश आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन स्वप्निल आसुरकर व आभार प्रदर्शन रोहित बावस्कर यांनी मानले.

---Advertisement---

कार्यक्रमाला स्वप्निल सोनवणे, जयेश कुठे, राजन लासूरकर, दिलीप सोनवणे, राजूभाऊ पासपोर्ट, रमेश सावळे, गणेश बोरसे, रावेरातील पत्रकार वैद्य, प्रवीण पाटील, चंद्रकांत विचवे, दीपक नगरे, दिलीप कांबळे, सी.एस.पाटील सर व असंख्य इतर समाजबांधव उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---